दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार; स्वतःच दिली माहिती

0
130
Deepali Sayyad Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. त्यानंतर शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही घणाघाती टीका केली.

दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सय्यद म्हणाल्या की, मला शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणले आहे. शिंदे गटातील प्रवेशानंतर मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती घेण्यासाठी तयार आहे.

संजय राऊत यांना जी शिक्षा झाली आहे ती त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली आहे. पक्ष तोंडानी कसा फोडला जाऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत हे होय, अशी टीका सय्यद यांनी केली. तसेच त्यांनी नीलम गोऱ्हे, सुद्धा अंधारे या चिल्लर आहेत. त्याच्यातील मुख्य सूत्रधार कोण असेल तर त्या रश्मी ठाकरे या आहेत. बीएमसीतून पैसे येणे थांबले असल्याचे दुःख रश्मी ठाकरे यांना होऊ लागले असल्याचे सय्यद यांनी म्हंटले.