सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या वेळकाढूपणामुळे राज्यातील ओबीसी आरक्षण गेलं अशी टीका फडणवीसांनी केली. आरक्षणावर महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे. आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेलं आहे. भाजपाकडून राज्यात ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ठाकरे सरकारने फक्त वेळकाढूपणा केला. सरकारला सांगूनही राज्य मागसवर्गीय आयोग गठीत केला नाही. कोणतीच हालचाल करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे कोर्टानं राज्यातील ५० टक्क्यांच्या आतलं सर्व राजकीय आरक्षण रद्द केलं. तसेच हे काम जिथपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत राजकीय आरक्षण देता येणार असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षण संपवण्याचं काम या सरकारने केले आहे.

४ मार्च २०२१ सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यानंतर मी विधानसभेत सांगितले अद्यापही वेळ गेला नाही. कोर्टाने इम्पिरिकल डेटा मागितला आहे. जनगणनेची आवश्यकता नाही. हे मी महाधिवक्त्यासमोर मांडले. त्यांनीही ते मान्य केले. सगळीकडून लाथा पडल्यानंतर आता सरकारने मागासवर्गीय आयोग गठीत करून इम्पिरिकल डेटा जमवण्याचं काम सुरु केले असं त्यांनी सांगितले. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण परत येत नाही तोवर भाजपा शांत बसणार नाही असा इशारा देशील फडणवीसांनी यावेळी दिला