याला म्हणतात तलफ…; चहा पिण्यासाठी भर रस्त्यात बस थांबवून चालक टपरीवर

0
149
Delhi driver bus road drink tea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र थंडी वाढली असल्यामुळे या थंडीत गरमागरम पदार्थ खाण्याची आणि चहा पिण्याची हौस अनेकांना असते. काहीजण चहा पिण्याच्या तल्लफेखातर मैलोमैल प्रवास करतात. तर काहीजण काहीही करतात. अशाच एक चहा शौकीन बस चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बसचालकाला चहा पिण्याची तलफ झाल्यावर भर रस्त्यावर बस थांबवली आणि तो थेट चहाच्या टपरीत घुसला.

चहा हे असे पेय आहे कि त्याची तल्लफ प्रत्येकाला होते. चहा पिण्यासाठी ही लोकं काहीही करू शकतात. सध्या सोशल मीडियावर या बस ड्रायव्हरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो एक चहाप्रेमी आहे. या व्हिडिओमध्ये तो रस्त्याच्या मधोमध बस थांबवून चहा घेण्यासाठी जाताना दिसत आहे. बस रस्त्यावर अचानक थांबल्यामुळे मागून येणारी वाहने थांबतात आणि त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बस चालकाच्या या कृतीमुळे रस्त्यावर अडकलेले लोक सतत हॉर्न वाजवताना दिसत आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर यूजर्सचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरत आहे.