दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | शीला दीक्षित यांचे दीर्घ आजाराने निधन झालेली आहे. त्या ८१ वर्षाच्या होत्या. एस्कॉर्ट हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यामध्ये गणल्या जात होत्या. गांधी घराण्यात त्यांच्या शब्दाला विशेष मान होता. तसेच १९९८ ते २०१३ या प्रदीर्घ काळात त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. एवढ्या सलग काळात मुख्यमंत्री राहणाऱ्या शिला दीक्षित या एकमेव मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या जाण्याने दिल्ली काँग्रेस मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शिला दीक्षित यांचा जन्म ३१ मार्च १९३८ साली पंजाबमधील कापूरथळा येथे झाला होता. जन्म जरी पंजाबमध्ये झाला असला तरी त्यांचे बालपण आणि सर्व शिक्षण दिल्लीमध्ये झाले होते. त्यांचे शालेय दिल्लीमधील कॉन्वेंट ऑफ जीसस एंड मैरी स्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर त्यांनी मिरांडा हाउस कॉलेज मधून कला शाखेचे पदवीत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. १९८४ ते १९८९ पर्यंत त्या उत्तर प्रदेश मधील कन्नोज लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होत्या. त्याकाळात त्यांनी संसदीय समित्यांवर देखील काम केले आहे.

शिळा दीक्षित यांचे पार्थिव त्यांच्या दिल्लीमधील निजामाद्दीन भागात स्थित निवासस्थळी अंत्यदर्शनाला ठेवण्यात आले आहे. त्याच प्रमाणे त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्याअनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याच प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीला दीक्षित यांच्यासोबतचा फोटो ट्विट करून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

 

 

 

Leave a Comment