केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील एक्सप्रेसवे बनून तयार; ना सिग्नल ना टोल, होणार सुसाट वाहतूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | देशातील वाहतूक सुविधा अजून वाढवण्यासाठी देशांतर्गत एक्सप्रेसवे तयार केले जात आहेत. यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे वेळोवेळी नवनवीन प्रकल्प राबवत असतात. दिल्ली ते मेरठ एक्सप्रेसवे आता सामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. या एक्सप्रेसवे भरती कोणताही टोल नाका आणि सिग्नल नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने जाऊ शकणार आहेत.

दिल्ली ते मेरठ एक्सप्रेसवे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या स्वप्नातील प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. हा एक्सप्रेस वे बनवून बनवून तयार असून मंगळवारपासून तो सामान्यांसाठी खुला करण्यात आला. यामुळे मिरज ते दिल्ली पर्यंतच्या 85 किलोमीटर लांबीपर्यंत वाहतुकीचा आणि ट्रॅफिकचा मोठा प्रश्न असू शकणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

हा प्रकल्प 2019 मध्ये तयार होणार होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प दोन वर्ष लांबला. 8346 कोटींचा हा रस्ता आता पूर्णपणे तयार असून, या रस्त्यावरून दररोज 50 हजार ते 1 लाख वाहने वाहणार आहेत. या रस्त्यामुळे मेरठ ते दिल्ली अंतर केवळ 45 मिनिटात कापता येणार आहे. सध्या तरी कोणतेही टोल लावले नसल्याने टोल न देताच वाहने तिथून जात आहे. एक्सप्रेसवे दासनापर्यंत 14 लेनचा आहे. दासनानंतर तो मेरठपर्यंत 6 लेनचा करण्यात आला आहे.

Leave a Comment