दिल्ली महापालिका निवडणुक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली महापालिका निवडणुकीच्या तारखांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त विजय देव यांनी महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 7 डिसेंबर रोजी निकाल लागणार असल्याचे जाहीर केले.

दिल्लीत राज्य निवडणूक आयुक्त विजय देव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिसूचना 7 नोव्हेंबर रोजी जारी होईल. उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर आहे. निवडणुकीसाठी मतदान 4 डिसेंबर आणि निकाल 7 डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच आचारसंहिता लागू होणार आहे.

नुकतीच गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली. यानंतर आता दिल्लीत महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर झल्याने राजकीय वातावरण चांगलच तापताना दिसत आहे. भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आता दिल्लीतील कचऱ्याच्या तसेच दूषित हवेच्या मुद्द्यावरून राजकारण रंगले आहे.