हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) बुधवारी दिल्लीतील EOW ऑफिसमध्ये हजर झाली. यावेळी जॅकलिनकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणाने EOW च्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. ज्यामुळे आता दिल्ली पोलीसांकडून पुन्हा एकदा जॅकलिनची चौकशी केली जाणार आहेत. आता पुढील आठवड्यात जॅकलिनची पुन्हा चौकशी होऊ शकते. जॅकलिनला EOW च्या टीमकडून सुकेशने तिला कोणकोणते गिफ्ट दिले याची लिस्ट तयार करण्यास सांगितले गेले आहे. यावेळी झालेल्या चौकशीदरम्यान जॅकलीन काही वेळा भावूकही झाल्याचे सांगण्यात आले आहे.
दुपारी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी जॅकलिनला (Jacqueline Fernandez) सांगितले की,” ती हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू शकते. मात्र जॅकलिनने यास नकार दिला. यानंतर दिल्ली पोलिस अधिकार्यांनी जेथे पोलिस जेवण करतात त्या EOW कँटीनमधून जेवण ऑर्डर केले, जे जॅकलीनने खाल्ले.
दुसरीकडे गुरुवारी दिल्ली पोलीस याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची देखील चौकशी करणार आहेत. बुधवारी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकसून सुमारे आठ तास जॅकलिनची (Jacqueline Fernandez) चौकशी केली गेली. याप्रकरणी गुरुवारी बॉलिवूडची प्रसिद्ध कलाकार नोरा फतेहीचीही पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, याआधी देखील दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोरा फतेहीची चौकशी केली होती.
दिल्ली पोलिसांच्या EOW शाखेकडून 29 ऑगस्ट आणि 12 सप्टेंबर रोजी दोन वेळा जॅकलिनला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र यावेळी जॅकलीन पोलिसांसमोर हजर राहू शकली नाही. यानंतर तिसरे समन्स जारी करत दिल्ली पोलिसांनी अभिनेत्रीला हजर राहण्याच्या सक्त सूचना दिल्या. ईडी कडून 215 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधातही (Jacqueline Fernandez) आरोपपत्रही दाखल केले गेले आहे. सुकेश चंद्रशेखरने तिला सुमारे 7 कोटी रुपयांचे दागिने गिफ्ट केल्याचा आरोप जॅकलिनवर आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.instagram.com/jacquelinef143/?hl=en
हे पण वाचा :
IRCTC ने रेल्वेच्या रिझर्व्हेशनसाठी सुरु केली नवीन सुविधा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, नवीन दर पहा
iphone वरून अँड्रॉइड फोनवर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरा ‘हे’ Apps
Multibagger Stock : ‘या’ केमिकल फार्मा कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश
Multibagger Stock : पतंजली फूड्सच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षात दिला 39,000% रिटर्न !!!