हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अगोदर संपूर्ण जगाने अशा महामारीचा सामना केला नव्हता. कोरोनच्या काळात काही ठिकाणी माणुसकी पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी आपलीच माणसे आपल्यापासून दूर जात आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. यामध्ये मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या मृतदेहाला अग्नी देण्याची जबाबदारी नाकारली आहे. मात्र पोलिसांनी माणुसकी दाखवत त्या महिलेच्या पार्थिवाला खांदा देऊन तिचे अंत्यसंस्कार देखील केले आहे.
काय आहे प्रकरण
सुरेंद्र कौर असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या. हि महिला जंगपुरा एक्स्टेशनमध्ये ती एकटी राहत होती तर तिचा मुलगा सिंगापूरला राहत होता. या महिलेने कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर ती आजारी पडली. आणि त्यामध्येच तिचे १९ एप्रिल रोजी निधन झाले. रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनने याची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर या घटनेची माहिती सिंगापूरला राहत असलेल्या महिलेच्या मुलाला देण्यात आली. मात्र त्या मुलाने अंत्यविधीला येण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला पण नातेवाईकांनीदेखील याकडे पाठ फिरवली. अखेर मग पोलिसांनीच पुढाकार घेऊन त्या महिलेचे अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी महिलेचा खांदा देत लोधी कॉलनी स्मशानात त्या महिलेचे विधीवत अंत्यसंस्कार केले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.