सोनिया गांधी विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत हायकोर्टाने केंद्राला पाठविली नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह अनेक नेत्यांविरूद्ध एफआयआर नोंदविण्याच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने केंद्राला आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले. ही याचिका हिंदू सेना नावाच्या संघटनेकडून दाखल करण्यात आली आहे.

गांधी परिवारातील सदस्यांबरोबरच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपचे आमदार अमानतुल्ला खान, मुंबईचे एआयएमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण आणि एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषण देण्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविण्याची विनंती या याचिकेत केली आहे. तसेच या नेत्यांनीच सीएएचा निषेध करण्यासाठी चिथाणीखोर भाषण करून लोकांना भडकवले त्यांना रस्त्यावर उतरण्यास सांगितले असा आरोप या याचिकेत केला गेला आहे. या सर्वाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने केंद्राला नोटीस बजावली आहे.या प्रकरणातील पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होईल.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment