पृथ्वीवरील पाण्याचा साठा कमी; पाणीच नसेल तर माणसाचं कस होईल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पाणी (Water) हे जीवन आहे. पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही हे जरी खर असलं तरी एक दिवस पृथ्वीवरील पाणी (Water On Earth) नष्ट होणार आहे असं जर तुम्हाला म्हणलं तर… सहाजिकच प्रश्न पडेल की मग मानवी जीवनाचं काय होणार? त्यासाठीच शाश्त्रज्ञ इतर ग्रहांवर जावून पाण्याचा शोध घेत आहेत. ह्याबाबत जाणून घेण्याआधी आपण पृथ्वीवर पाणी कसे आले ते जाणून घेऊ.

कसे आले पृथ्वीवर पाणी?

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी एका केलेल्या अभ्यासात समोर आले की, पृथ्वीची निर्मिती सुरुवातीला कोरड्या आणि खडकाळ पदार्थांपासून झाली होती, यावरून असे दिसून येतं की ग्रहावर पाणी नंतर आलं असावं. पृथ्वीच्या निर्मितीच्या शेवटच्या १५ टक्क्यांमध्ये पाणी आणि जीवनासाठी आवश्यक असलेले पदार्थ समाविष्ट झाले आहेत. पृथ्वी ४.५ अब्ज वर्षे जुनी असल्याचा अंदाज असून शास्त्रज्ञ अजूनही ती कशी तयार झाली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोट्यावधी रुपये खर्च करून ग्रहांवर शोधले जातेय पाणी

पृथ्वीवरील वाढलेल्या पायाभूत सुविधानमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कमी होणारा ओझोनचा थर, पाण्याचे कमी होणारे प्रमाण यामुळे मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. यासाठी जगभरातील सर्वच शास्त्रज्ञ कोट्यावधी रुपये खर्च करून इतर ग्रहांवर आपले यान पाठवून पाण्याचा शोध घेत आहेत.

पृथ्वीवर किती टक्के साठा शिल्क्क आहे?

पृथ्वीवर निर्माण झालेले कारखाने ह्यामुळे पाण्याचे प्रेम मर्यादित स्वरूपात आहे. पृथ्वीवरील पाण्याच्या एकूण प्रमाणाबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या सुमारे 326,000,000,000,000,000,000 गॅलन म्हणजेच 326 अब्ज गॅलन पाणी आहे. जे 1260 अब्ज लिटर आहे. पण, हे पाणी एका ठिकाणी नाही आणि जिथे आहे तिथे ते फार काळ टिकत नाही. पाणी अनेक रूपात फिरते. या संपूर्ण प्रक्रियेला जलचक्र म्हणतात.

आतापर्यंत कोण कोणत्या ग्रहांवर सापडले पाणी?

पाणी हे द्रव स्वरूपात असते. परंतु त्याचे 98% प्रमाण हे नदी, नाले, तलाव ह्यामध्ये समावलेले आहे. आतापर्यंत शास्त्रज्ञाना एकही असा ग्रह सापडला नाही जिथे पाणी द्रव स्वरूपात आहे. पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे जिथे पाणी द्रव स्वरूपात आहे. चंद्र आणि मंगळ ह्या ग्रहावर पाणी सापडले मात्र ते बर्फ ह्या स्वरूपात प्राप्त झाले आहे. खगोलशास्त्रज्ञांना शनि आणि गुरूच्या चंद्रांमध्ये पृष्ठभागाखाली द्रव पाणी सापडण्याची अपेक्षा आहे.

पृथ्वीवरील पिण्याचे पाणी नष्ट झाले तर

पृथ्वीवर पिण्याचे पाणी नष्ट झाले तर मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. परिणामी भूकंप होण्याचे प्रमाणही वाढण्याचा धोका वर्तवला जात आहे.

1995 मध्ये पाण्यासाठी युद्ध होणार असे भाकीत करण्यात आले होते

जागतिक बँकेचे उपाध्यक्ष इस्माईल सेरागेल्डिन यांनी 1995 मध्ये भाकीत केलं होतं की, भविष्यात पाण्यासाठी युद्धाला सामोरे जावे लागणार आहे. सध्या युनायटेड स्टेट्समध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. तिथे 35 राज्ये पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येशी लढत आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था म्हणजेच नासा (NASA) यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. पृथ्वीवरील पिण्यायोग्य पाण्याचा साठा वाढवण्यासाठी समुद्रातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.