हे कसले पोलादी पुरुष? हे तर तकलादू पुरुष; ठाकरेंचा मोदींवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हे कसले पोलादी पुरुष? हे तर तकलादू पुरुष असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. आज जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी जनतेला संबोधित करताना ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात फौजा घुसवल्या, निजामाला हुसकावले, रझाकारांचे अत्याचार थांबवले आणि मराठवाडा अभिमानाने महाराष्ट्रात समील करून घेतला होता. आज आपण त्यांचे पुतळे उभारतोय. पण वल्लभभाईंनी मराठवाड्यात जशी कारवाई केली. तशी मणिपूरममध्ये कारवाई करायची यांची हिंमत होत नाही आणि हे स्वत:ला पोलादी पुरुष म्हणून घेत आहेत. हे कसले पोलादी पुरूष? हे तर तकलादू पुरूष आहेत. अशा या कारभाराचा आपल्याला सोक्षमोक्ष लावायचा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केला आहे.

दरम्यान, सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मान मिळाला याबद्दल आभारी आहे. सरदार पटेल याना दूरदृष्टी होती. त्यांनी त्याकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएस वर बंदी घातली होती. स्वातंत्र्यप्रेम म्हणजे काय ? देशप्रेम म्हणजे काय हे त्यांना पक्के कळत होतं. असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी गुजरात येथील स्टॅचू ऑफ युनिटीवरूनही मोदींवर निशाणा साधला. जगातील सर्वात उंच पुतळा बांधला. पुतळ्याची उंची ठिक आहे. कामाची उंची कधी गाठणार? वल्लभभाईंनी जे काम केलं ती उंची गाठा ना? असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.