हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा सातारा जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जातानाचा दौरा चांगलाच गाजत आहे. कारण सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ येथे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे आता पर्यंत थोरल्या पवारांवर जीवापाड प्रेम करणारी जी मंडळी होती. त्यांनी कार्यकर्त्यांसह मिळून क्रेनच्या साह्याने धाकल्या पवारांवर गळ्यात मोठे पुष्पहार घातले. विशेष म्हणजे काका शरद पवार यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळा बाहेर ज्या पारावर उभे राहून भाषण केले त्याच ठिकाणी स्टेज उभे करून तेथे पुतण्या अजितदादा पवार हे भाषण ठोकणार आहेत. यावेळी ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै 2023 रोजी आणखी एक मोठा राजकीय भूकंप सर्वांनी पाहिला. तो म्हणजे अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा आशीर्वाद घेऊन लढाईचं रणशिंग फुंकले. चव्हाण साहेबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी समाधिस्थळावरून बाहेर येत लगतच्या पारावर उभ राहून जनतेला संबोधित केले. आता त्याचा ठिकाणी स्टेज उभारून त्यांचा पुतण्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे भाषण ठोकणार आहेत.
विशेष म्हणजे त्यांनी बोलण्यासाठी काकांनी ज्या ठिकाणी भाषण केले. त्याच ठिकाणाहून थोड बाजूला स्टेज उभारून त्यावरून अजितदादा बोलणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर सर्वजण तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चांगलेच लक्ष ठेवले जात आहे. कारण अजितदादांच्या दौऱ्यापूर्विच काही छुपेरुस्तम त्यांच्या स्वागताच्या बॅनरवर आपला फोटो लावून गटात गेल्याचे दाखवून दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादांवर केली फुलांची उधळण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ येथे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, कापूरहोळ येथे अजित पवार यांच्यावर क्रेनच्या साह्याने केलेली फुलांची उधळण व घातलेला मोठा पुष्पहार आकर्षण ठरले. तर यावेळी स्वागताने भारावलेल्या पवार यांनी विक्रम खुटवड यांना सोबत घेत उपस्थित कार्यकर्त्यांच्या अंगावर देखील फुलांची उधळण करून त्यांचा ताफा कोल्हापूरकडे रवाना झाला.