Saturday, February 4, 2023

आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय – अजित पवार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसरकारने परवानगी दिल्यानंतर आजपासून नाट्यगृह, चित्रपटगृह खुली झाली आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह सुरु झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी पवार यांनी आम्हाला देवळातली घंटा वाजवायची सवय आहे, मात्र मी पहिल्यांदा नाट्यगृहातील घंटा वाजवली” असे म्हंटले. त्यांच्या या विधानानंतर एकच हशा पिकला.

​उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अनेकवेळा भाषणा दरम्यान विनोद केले जातात. आज त्यांनी पुणे येथे असाच एक विनोद केला. त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्याला आले असता. त्यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय आहे. पण आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली. कोरोनामुळे लोकांमध्ये निराशा आली होती. पण आता तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्याने कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतोय. दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याचा विचार केला जाईल.

- Advertisement -

यावेळी पवार पुढे म्हणाले, निसर्गापुढे काही चालत नाही, 19 महिने झाले नाट्यगृह, चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आलेली होती. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळी आली. रंगभूमीतील कलाकार माझी सारखी भेट घ्यायचे. नाट्यगृह कधी सुरु होणार असाही प्रश्न विचारायचे. त्यावेळी मीही त्यांना सांगायचो कि लवकर याबाबात निर्णय घेऊ. आता आपण नाट्यगृह सुरु करण्याला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता काही काळजी करू नये