हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांकडून गेल्या महिनाभरापासून विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने आता आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. आता कोरोनाच्या संकटानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. गरीबांसाठी एसटी हे वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे, असे सर्व असतानाही एसटी कर्मचारी हट्टाला पेटलेत हे बरोबर नाही. आता सहनशीलता संपत आली आहे, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा इशारा पवार यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एसटीच्या विलीनीकरणा संदर्भात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे, की त्यांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे. एसटी कर्मचारीही आपलेच आहेत व प्रवासीही आपलेच आहेत यामध्ये समजूतदार भूमिका घेणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावे कि टोकाची भूमिका घ्यायला लावू नका.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अनेकदा मुभा ही दिली आहे. मात्र, या सर्व गोष्टीची सहनशीलता संपण्याची वेळा आली आहे. सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये. त्यामुळे सगळ्या एसटी कामगारांना तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे. मेस्मा लावण्यासारखा किंवा टोकाचा निर्णय घेतला तर आतापर्यंत तुटेपर्यंत ताणणाऱ्या संपामध्ये काय झालं हे पाहिलं आहे.
तर नवीन भरती प्रक्रिया सुरु करणार – पवार
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या नवीन भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली. कुणी ऐकायला तयार नसेल नवीन भरती सुरू केली तर नोकरीचा प्रश्न येणार की नाही. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी टोकाची वेळ येऊ देऊ नये. आता पगार वाढवला. पगार वेळच्या वेळी देण्याचा निर्णय झाला आहे. तरीही आता कामावर रुजू न झाल्यास नवीन भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे पवार यांनी सांगितले.