हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय केला जात आहे. याबाबत आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या [पत्रात त्यांनी सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, सीमाभागातील बांधवांना न्याय मिळावा यासाठी येथील मराठी नागरिक पत्रे लिहून पंतप्रधानांना विनंती करत आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री नात्याने मी देखील या मागणीला पाठिंबा देत असून त्यांची मागणी मान्य करावी. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होई पर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे.
सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी केली आहे. याबाबत अजितदादा पवार यांनी @PMOIndia यांना पत्र लिहिले आहे. pic.twitter.com/rDSSj8a8p8
— NCP (@NCPspeaks) August 11, 2021
सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायची असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री
आहे. त्यामुळे आपणही या प्रश्नी लवकरात लवकर ठोस पाऊले उचलावीत व लक्ष घालून हा प्रश्न लवकर सोडवावा, अशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.