परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्याची पुनरावृत्ती नको म्हणून दक्षता; अजितदादांनी स्पष्टच सांगितले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी वारीसाठी फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच वारीसाठी काही अटी आणि शर्तीही घालण्यात आल्या आहेत. पण राज्य सरकारनं निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. तर भाजपनंही सर्व अटी-नियमांच्या अंतर्गत पायी वारीला सरकारनं परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात जे घडलं त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे, असं अजित पवार यांनी म्हंटल.

वारकरी, पोलीस, प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि इतरांशी चर्चा करूनच राज्य सरकारने वारीबाबतचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण सध्या कोरोनाचं सावटही आहे. त्याचाही विचार केला पाहिजे. मागील वर्षी वारीला जे निर्बंध घालण्यात आले होते. तसेच निर्बंध यावेळी लावण्यात आलेले नाहीत. कुंभमेळ्यात जे घडलं तसं इथं घडू नये याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठीच समन्वय साधून पालखी सोहळ्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे”, असं अजित पवार म्हणाले.

राज्यात अनलॉकला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पायी वारीसाठीची उपाययोजना सरकारनं करावी अशी मागणी केली जात होती. पण पायी वारीमुळे लाखो भाविक एकत्र येतात आणि त्यामुळे कोरोनाचा धोका पत्करुन असा निर्णय घेता येणार नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment