मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली. संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनतर ते गायब असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राठोड गायब नसल्याचा पुनरुच्चार केला. तसंच त्यांच्यांसोबत फोनवर बोलणं झाल्याचा खुलासा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलाय.
संजय राठोड हे गायब असल्याचे वृत्त फेटाळून लावत आजच माझं लॉकडाऊनसंदर्भात संजय राठोड यांच्याशी फोनवरुन बोलणं झालंय असं अजित पवार म्हणाले. यवतमाळ, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत करोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळं या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार आहे. तिथली परिस्थीत गंभीर बनत चाललीये तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल, असं राठोड यांच्या कानावर घातलं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री आहेत.
यावेळी अजित पवारांना पूजाच्या आत्महत्येप्रकरणी अरुण राठोडला ताब्यात घेतलं आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, काही जणांना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. मी काही पोलिसांसोबत संपर्क साधला नाही. कारण नसताना आम्ही सारखं फोन करुन संपर्क साधला तर त्यात राजकीय हस्तक्षेप होतो अशा गोष्टी बोलल्या जातात, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.