100 वेळा नकार मिळूनही मुलीने मानली नाही हार, आता बनली आहे अब्जाधीश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । यश मिळवण्यासाठीचे एक सूत्र आहे. हे सूत्र जगाच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितले गेले आहे, या सर्वांचा सार मात्र एकच आहे की, एखाद्याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे जात रहावे आणि हार मानू नये. Canva च्या को-फाउंडर आणि CEO Melanie Perkins यांच्या कथेचे हे सार देखील असेच आहे, ज्या स्वतःच्या हींमतीवर आज अब्जाधीश बनल्या. Melanie ला त्यांच्या आयुष्यात 100 हून अधिक नकारांना सामोरे जावे लागले. केवळ काही लोकंच आज त्या ज्या व्यवसायिक जगात आहेत त्या ठिकाणी पोहोचू शकले आहेत. ती प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कथेने प्रेरित होऊ शकते जिला आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे मात्र ती पुन्हा पुन्हा निराश होते.

Canva म्हणजे काय आणि त्याची खासियत काय आहे
Canva एक ग्राफिक डिझाईन ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्हाला हवी असलेली कोणतीही डिझाईन तयार करता येते. जेव्हा तुम्ही Google मध्ये Canva सर्च करता, तेव्हा त्याची वेबसाइट पहिल्यांदा येते, ज्याचे पूर्ण टायटल Canva. Design for everyone असे आहे. ज्यांना डिझायनिंगचे ज्ञान नाही, ते सुद्धा Canva द्वारे अगदी सहजपणे डिझाईन बनवू शकतात. या प्लॅटफॉर्मचे हेच वैशिष्टय आहे की, डिझाइनिंगच्या ज्ञानाशिवाय देखील याद्वारे सुंदर डिझाईन्स बनवता येतात. आता Canva व्यावसायिक डिझायनर्स आणि ज्यांना डिझाइनचे स्पेलिंग कसे लिहावे हे देखील माहित नाही ती लोकं देखील वापरतात.

पार्ट टाइम टीचिंगच्या वेळी आली आयडिया
Melanie आता फक्त 34 वर्षांच्या आहे. त्यांचा जन्म 1987 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झाला. 2007 मध्ये त्या एका विद्यापीठात पार्ट टाइम टीचिंग करत होत्या. त्यांना मुलांना डेस्कटॉप डिझाईन सॉफ्टवेअर शिकवायचे होते. यावेळी Melanie यांना वाटले की, यासाठीचे सॉफ्टवेअर खूप गुंतागुंतीचे आहे. तसेच ते शिकणे आणि शिकवणे देखील सोपे नाही. शिवाय ते सॉफ्टवेअर देखील खूप महाग आहे. येथूनच त्यांना Canva बनवण्याची आयडिया आली. त्यांना वाटले की, यासाठी एक असे टूल असावे ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती सहजपणे डिझाईन बनवू शकेल.”

अशा प्रकारे कंपनीने केली सुरुवात
Melanie यांनी नंतर आपल्या बिझनेस पार्टनरसह Fusion Books नावाची कंपनी सुरू केली. Fusion Books ही एक डिझाईन कंपनी होती. त्यावेळी Melanie यांचा बिझनेस पार्टनर Cliff Obrecht होते. दोन्ही बिझनेस पार्टनर Cliff आणि Melanie नंतर आयुष्यभराचे जोडीदार बनले. दोघांनीही लग्न केले. 2012 मध्ये, Cameron Adams नावाची दुसरी व्यक्ती त्यांच्यात सामील झाली आणि तिघांनी मिळून Canva सुरू केला. Canva इतर प्लॅटफॉर्मपेक्षा खूपच सोपा होता.

100 वेळा नाकारले गेले
प्रत्येक व्यवसायाचे यश हे कधी आणि किती फंडिंग मिळतो यावर अवलंबून असते. जर कोणाची आयडिया 100 पेक्षा जास्त वेळा नाकारली गेली तर समोरची व्यक्ती स्वतःच्या क्षमतेवर शंका घेण्यास सुरुवात करेल. मात्र Melanie च्या बाबतीत असे घडले नाही. त्यांचा स्वतःवर आणि त्यांच्या कल्पनेवर पूर्ण विश्वास होता. कंपनीला पहिला फंडिंग मिळण्यासाठी तीन वर्षे लागली. Melanie Perkins स्वतः सांगतात की,” प्रत्यक्षात त्यांच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे फंडिंग मिळवण्यात अडचण आली. चुकीच्या दृष्टिकोनाचा अर्थ असा आहे की, व्यवसाय ज्या पद्धतीने प्रेझेंट केला गेला पाहिजे तसा न करता कंपनी तांत्रिकतेला चिकटून राहिली. जेव्हा जेव्हा संभाव्य गुंतवणूकदाराशी चर्चा व्हायची तेव्हा त्यांना Canva च्या तांत्रिक उपायांविषयी (Technicle Solutions) सांगितले जात आणि शेकडो मिटींग्स अशाच प्रकारे संपल्या.

गोष्टींद्वारे स्पष्ट केले
Melanie आणि तिच्या पार्टनर्सना हळूहळू लक्षात आले की, गुंतवणूकदारांना तांत्रिक उपाय माहित असणे गरजेचे नाही. त्यांना आणखी काही जाणून घ्यायचे आहे. मग त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला. आता त्यांनी संभाव्य गुंतवणूकदारांना गोष्ट सांगायला सुरुवात केली. Melanie गुंतवणूकदारांना सांगत असे की, तिचे विद्यार्थी कसे नाराज आहेत. ते म्हणायचे की, सॉफ्टवेअरची बटणे कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण सेमेस्टर लागतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी Canva तयार केले गेले आणि लोकं सतत Canva शी जोडली जात आहेत. तेच, मग काय व्हायचं होत… संभाव्य गुंतवणूकदार आता गुंतवणूकदारांमध्ये बदलू लागले आणि कंपनी वाढू लागली.

Melanie Perkins ची चर्चा सगळीकडे का होते आहे ?
गेल्या दोन-तीन दिवसात Melanie Perkins चा उल्लेख जगभरातील वृत्तपत्रे, न्यूज वेबसाइट्स आणि टीव्ही चॅनल्समध्ये नक्कीच झाला आहे. यामागील कारण म्हणजे Canva ला नुकतीच 200 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक मिळाली. या गुंतवणूकीनंतर, Canva ही कोणत्याही स्त्रीद्वारे चालवल्या जाणाऱ्या जगातील सर्व स्टार्ट-अपमध्ये पहिल्या क्रमांकाची स्टार्टअप कंपनीबनली आहे. कंपनीचे मूल्य सध्या 40 अब्ज डॉलर्स आहे. रुपयामध्ये मोजायचे तर 22 ट्रिलियन पेक्षा जास्त.

Leave a Comment