हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाला असल्याचे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर पराभवाचे खापर फोडले. आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मते दिली नाहीत, असे राऊत म्हणाले. यावरून आता अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मते फुटली म्हणणारे संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? आम्हाला असे वाटत कि राऊतच ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहेत? असा टोला भुयारांनी लगावला.
संजय राऊतांच्या आरोपानंतर देवेंद्र भुयार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राऊतांचे सर्व आरोप फेटाळून लावले. भुयार म्हणाले की, वास्तविक आम्ही जे काही मतदान करतो ते पूर्णपणे गोपनीय राहत असते. मी त्यांना मत दिलेले नाही हे राऊतांना कसे कळले. खरं ते मी महाविकास आघाडीत सुरुवातीपासून आहे राऊतच नंतर आले. किमान समान कार्यक्रम ठरला त्यावेळी मी सोबत होतो, शिवसेना नंतर आली. मी कुठलाही दगाफटका केलेला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबाबत भुयार म्हणाले की, माझ्यावर आरोप होत आहे कि मी मत दिले नाही कारण मी नाराज होतो. होय मी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे पण माझी वयक्तिक नाराजी नाही. माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न आहेत. आमच्या प्रश्नांसाठी वेळ दिला नाही, त्यावरुन माझी नाराजी नाही. माझी नाराजी मुख्यमंत्र्यांवर होती. पण मी मत मात्र प्रामाणिकपणे दिले आहे.
मी राऊतांच्या आरोपांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार
मी भाजपकडे कसा जाईल. माझ्या विरोधात उभे असलेले बोंडे तिकडे उभे होते. मी त्यांच्याकडे कसा जाईल. संजय राऊत बेछूट बोलत आहे जे योग्य नाही, याबद्दल मुख्यमंत्री आणि शरद पवारांशी बोलणार आहे, असेही भुयार म्हणाले.