ही तर आणीबाणी; मार्शलच्या कारवाई नंतर फडणवीस आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने भाजपचे 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक रूपात विरोधीपक्ष नेत्याचे भाषण करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

आज १२ वाजता प्रतिविधानसभेत मी बोलणार म्हणून मार्शलना पाठवून आम्हाला हटवण्यात आले. मात्र आमचा आवाक कुणीही बंद करू शकत नाही. सरकारला लोकशाहीची चाड नाही. मात्र आम्ही लोकशाही जिवंत ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही विरोधात आवाज उठवत राहू. हे सरकारच सर्वच बाबतीती अपयशी ठरले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

सरकारने मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. मार्शलशी आमचं भांडण नाही. ते आमचे शत्रू नाहीत. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार अस म्हणत माध्यमांवर मार्शलकरवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असं फडणवीस यांनी म्हंटल.