हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकार मधील अनलॉक च्या गोंधळावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहे असा चिमटा काढत केवळ श्रेयवादासाठी या मंत्र्यांनी घोळ घालण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.
“ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री बोलतात. राज्यात एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री आहेत. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असं सांगतो. प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्य सरकारने आधी अनलॉक जाहीर केला. नंतर घुमजाव केल्याने मला अनेकांचे फोन आले. लॉकडाऊन आहे की नाही आम्हाला विचारण्यात आलं. मात्र, आम्हाला या निर्णयाची माहिती नसल्याने आम्हाला त्यांना काही सांगता येत नव्हतं. पण मुख्यमंत्र्यांची प्रेसनोट अधिकृत असते. त्यावर विश्वास ठेवा, असं मी सांगितलं. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊननंतर काल लोकांची उत्सुकता वाढली होती. उत्कंठाही वाढली होती. संभ्रमही निर्माण झाला आणि निराशाही झाली. असेही फडणवीसांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.