मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही? फडणवीसांचा पवारांना सवाल

PAWAR FADANVIS
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आणि शरद पवारांवर निशाणा साधलाय.

मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला गेला. त्यावेळी त्यांना जालियनवाला बाग आठवला नाही का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय तसेच आजचा बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे असेही ते म्हणाले.

लखीमपूरच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात बंद केला जातो. पण दुसरीकडे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मात्र हे सरकार एकही पैसा द्यायला तयार नाही. आज राज्यातील शेतकरी संकटात आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आतापर्यंत तब्बल दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक संकटांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही असा आरोपही फडणवीस यांनी केला.