राज्य सरकारने आता तरी कोकणाला मदत करावी; फडणवीसांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा सर्वात जास्त तडाखा मुंबई आणि कोकण किनारपट्टीला बसला आहे. रत्नागिरी , सिंधुदुर्ग आणि चिपळूण येते जोरदार अतिवृष्टी झाली असून महापुराचे संकट आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता तरी राज्य सरकारने कोकणाला मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

फडणवीस म्हणाले, गेल्या वर्षभरात कोकणाला बसलेला हा तिसरा फटका असून परिस्थिती भीषण आहे . यापूर्वी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळावेळी राज्य सरकारने कोकणाला मदत केली नाही. किमान आतातरी मदत द्यावी. तसेच आवश्यक त्या सर्व यंत्रणा मदतीसाठी तयार ठेवाव्यात, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी

बुधवारपासून मुसळधारपणे कोसळलेल्या पावसामुळे चिपळूण शहर जलमय झाले आहे. अनेक गावांचेही पूल पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे.