‘बारामती’ हे मिशन महाराष्ट्र अंतर्गतच- देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यातच आता भाजपकडून शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष घालण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस याना विचारलं असता बारामती’ हे मिशन महाराष्ट्र अंतर्गतच येत असं स्पष्टीकरण त्यानं दिले. पुरंदर येथील भिवडी येथे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईकांची शासकीय 231 जयंतीनिमित्त त्यांनी उपस्थिती लावली होती, त्यावेळी ते बोलत होते.

मी याआधीच सांगितलं आहे की आमचं मिशन महाराष्ट्र चाललं आहे, आमचं मिशन इंडिया चाललं आहे, बारामती हे महाराष्ट्रातच येत ते काही महाराष्ट्राबाहेर नाही त्यामुळे मिशन महाराष्ट्रच्या अंतर्गत बारामती आहे. असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिले.

शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गटाचे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी केली आहे याबाबत विचारलं असता मला याबाबदल काहीही माहिती नाही, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर बोलताना आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. मला याबाबत काहीही माहिती नाही, मी माहिती घेतल्यांनंतरच त्यावर बोलता येईल पण तरीही केस सुरु असताना याबावर बोलणं योग्यच नाही असं फडणवीस म्हणाले.