उत्पल पर्रीकरांना तिकीट देत होतो, पण…; फडणवीसांनी सांगितली इनसाईड स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे. यानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देत भाजपची भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उत्पल पर्रिकर यांना आम्ही भाजपकडून तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना आम्ही इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक पर्याय त्यांनी नाकारला आहे. पण दुसऱ्या पर्यायाबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. मला असं वाटतं की दुसऱ्या पर्यायाबद्दल ते सकारात्मक उत्तर देतील.

दरम्यान, यावेळी फडणवीसांनी काँग्रेस वर हल्लाबोल केला. काँग्रेसला गोव्याचं काही पडलं नाही. केवळ लूटीचं राजकारण सुरू करता यावे यासाठी काँग्रेसला गोवा हवा आहे. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी काँग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे अशी टीका त्यांनी केली.