संजय राऊत कागदावरचे लीडर; फडणवीसांची जळजळीत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांचा दौरा करता करता शिवसेनेच्या माजी आमदाराला गळाला लावलं आणि पोटनिवडणुकीची उमेदवारीही दिली. यानंतर शिवसेनेनं सामना अग्रलेखातुन फडणवीसांवर हल्लाबोल केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी संजय राऊतांना लक्ष केलं. संजय राऊत कागदावरचे लीडर आहेत अशी जळजळीत टीका त्यांनी केली.

लातूर येथे फडणवीसांना सामनातील टिकेबद्दल विचारलं असता फडणवीस म्हणाले, जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात. अग्रलेख लिहून नेते होतात. त्यांना शेतकऱ्यांचा दुःख काय माहीत? हे ऑफिसमधले लीडर आहेत. हे कागदावरचे लीडर आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं, असं फडणवीस म्हणाले.

सामनातून नेमकं काय म्हंटल-

श्री. फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागावी व राज्याचे रखडलेले पैसे आपले वजन वापरून घेऊन यावेत. मराठवाडय़ातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणारया फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साथलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौराही अखेर ‘व्हाया ओला दुष्काळ राजकारण, असाच झाला म्हणायचा! असेही शिवसेनेने म्हंटल.

Leave a Comment