संजय राऊतांचा अजेंडा काँग्रेसला जिंकवणे हाच आहे ; फडणवीसांचा हल्लाबोल

sanjay raut devendra fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी या ठिकाणी आले. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरलेली नाही”, असा घणाघात फडणवीस यांनी यावेळी केला.

संजय राऊत यांचा अजेंडा काँग्रेसला जिंकवणे हा आहे. नाहीतर ही पोटनिवडणूक आहे. ज्या ठिकाणी एक सिनियर नेते वारले, त्यांची पत्नी निवडणुकीला उभी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती कधी निवडून येऊ शकत नाही हे माहीत आहे. अस असताना ते इथे आले. कारण अलीकडे शिवसेना आणि काँग्रेस हे जवळ आले आहेत. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.

ढवळ्या शेजारी पवळ्या बांधल्या आणि गुण नाही तर वाण लागला, अशी अवस्था झालीय. काँग्रेसच्या सोबत राहून शिवसेनेने अजाण स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवगाण स्पर्धा घेऊ. आम्ही छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत शिवगाण स्पर्धा घेतली”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group