आजच्या बंद मुळे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला आहे. आजच्या बंद मुळे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड झाला आहे अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्र बंदला नागरिकांचा पाठिंबा नाही,नागरिकांना दमदाटी करत , धमकावत हा बंद करायला लावला आहे. आजच्या बंद मुले महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा त्यांचे अश्रू पुसायला हे गेले होते का असा सवाल त्यांनी केला. तेव्हा शेतकऱ्यांना एका पैशाची देखील मदत करण्यात आली नाही असेही फडणवीसांनी म्हंटल.

मावळ मध्ये जेव्हा शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला होता तेव्हा याना जालियनवाला बाग आठवली नाही का असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला. उत्तरप्रदेश घटनेवरून केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. मात्र सर्वच शेतकऱ्यांना भाजपविरोधी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही असेही फडणवीसांनी म्हंटल