महाविकास आघाडी सरकारकडून लखीमपूरच्या घटनेचं राजकारण; दरेकरांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आज महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना त्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये. अशावेळी मविआ सरकार लखीमपूरच्या घटनेचं राजकारण करत आहे, असे दरेकर यांनी म्हंटले आहे.

प्रवीण दरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मविआ सरकार लखीमपूरच्या घटनेचं राजकारण करत आहे. आज महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना त्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये. त्याचे पाण्याचे,विजेचे कनेक्शन रद्द होत आहे परंतु अशावेळी लखीमपूर घटनेचं राजकारण करून महाराष्ट्रातल्या जनतेला वेठीस धरलं जात आहे,”

आज महाराष्ट्रात बलात्कार,शेतकरी आत्महत्या सारखे प्रकार घडत आहेत. त्यावेळेला आपण कॅबिनेटला कधी श्रद्धांजली वाहली नाही. परंतु आज या घटनेचं राजकारण करण्यासाठी श्रद्धांजली वाहत आहात. कोरोनाने व्यापारी, शेतकरी त्रस्त आहेत, तेव्हा तुमच्या राजकारणासाठी बंद करून जनतेची अडवणूक करू नका, असेही ट्विटमध्ये दरेकर यांनी म्हंटले आहे. लखीमपूर हिंसेच्या विरोधात महाविकास आघाडीन बंद पुकारला. परंतू या बंदाला भाजप नेते प्रविण दरेकर विरोध दर्शवला. राज्यात इतर घटना घडल्या तेव्हा मविआ काय करत होती ? असा सवालहि दरेकर यांनी केला आहे.

Leave a Comment