हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन करतच महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, हे सारे काही झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली असे फडणवीसांनी म्हंटल आहे.
फडणवीस याबाबत ट्विट करत म्हंटल की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, हे सारे काही झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण तसेच सर्व भाजपा नेते, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सरकारी यंत्रणेचा गैरवापर,
पोलिसी दडपशाही,
सत्तेची अरेरावी,
मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय!
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!@MeNarayanRane https://t.co/KgG7hB90Da— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 31, 2021
दरम्यान, नारायण राणे यांनी या विजयानंतर आपलं पुढील लक्ष्य हे महाराष्ट्र सरकार असेल अस म्हणत डरकाळी फोडली आहे. राज्याला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज असून राज्यातील जनतेच्या सुखासाठी राज्यात भाजपच सरकार हवं लगानची टीम नको अस म्हणत आता आमचं पुढच लक्ष हे महाराष्ट्र सरकार हेच असेल असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला.