हे एक सुनियोजित षडयंत्र; अमरावती हिंसाचाराप्रकरणी फडणवीसांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्यातच अमरावती येथील मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे. या सगळ्या परिस्थितीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत हे एक सुनियोजित षडयंत्र आहे असा गंभीर आरोप केला आहे.

फडणवीस म्हणाले, त्रिपुरामध्ये मशीद जाळण्यात आल्याच्या प्रकरणाचा निषेध म्हणून हे मोर्चे काढले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अशी कोणतीच घटना घडली नाही. अमरावतीमधील घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. मी सर्वांना विनंती करतो की, अमरावतीत शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार करू नये. पण ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही, त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणं अत्यंत चुकीचे आहे.

दरम्यान, आज अमरावतीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. आज सकाळी अमरावतीत मोठ्या संख्येने जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. तर शहरातील राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली. या परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट उठताना दिसत होते. दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. त्यानंतर जमाव पांगला गेला.

Leave a Comment