हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत आंदोलन केलं. या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील वातावरण चिघळले आहे. दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत थेट पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. पवारांच्या घरावरील हल्ला हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे अस त्यांनी म्हंटल.
https://youtu.be/H3HkV3ib654
देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद यांच्या घरावरील हल्ल्या बाबत बोलताना म्हंटल की, एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरांवर लोक चाल करुन जातात मग पोलिस काय करत होते? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला ही भयावह परिस्थिती असून पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी असेही ते म्हणाले.
दरम्यान, घटनेमागे कोण आहे, त्याचा तपास केला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आंदोलक कसे घुसले, गुप्तचर विभागाला त्याची काही माहिती मिळाली नाही का, याचाही तपास केला जाईल. तशा सूचना पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती वळसे यांनी दिली.