एकनाथ शिंदेंनी बंड का केलं?? फडणवीसांनी सांगितले नेमकं कारण

Eknath shinde fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक खेळत एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केलं. आज फडणवीस आणि शिंदे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही घोषणा केली तसेच शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड का केलं? याची कारणेही फडणवीसांनी सांगितली.

फडणवीस म्हणाले, शिवसेना आमदारांची सरकार मध्ये कुचंबना होत होती. अपमान होत होता. रोज अपमान होत असेल तर कशाच्या भरवशावर आम्ही लढायचं. ज्यांना आपण हरवलं त्यांना निधी देण्याचं काम केले जात होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तोडा, आम्ही त्यांच्यासोबत राहायला तयार नाही अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली. परंतु दुर्देवाने उद्धव ठाकरेंनी आमदारांपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीला शेवटपर्यंत धरून ठेवले अस फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. म्हणून शिवसेना आमदारांनी आपला आवाज बुलंद केला. आणि आम्ही पर्यायी सरकार दिले अस फडणवीस म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदे आज रात्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अस फडणवीस यांनी जाहीर केलं. तसेच आपण स्वतः या मंत्रिमंडळाबाहेर असेल असेही फडणवीस म्हणाले.