Wednesday, October 5, 2022

Buy now

ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही; फडणवीसांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण करत भाजपवर प्रहार केला. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच असे खुले आव्हान त्यांनी भाजपला दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. ज्या दिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही असा इशारा फडणवीसांनी दिला.

सरकार पाडून दाखवा हे रोज म्हणतात. ज्या दिवशी पडेल ते कळणारही नाही. आम्हाला सध्या त्यात रसही नाही. कामं करून दाखवा, शेतकऱ्यांची मदत करा, तुमच्या हाती सत्ता आहे तुम्ही मदत करून दाखवा, असं फडणवीस म्हणाले. जनतेसोबत बेईमानी करत हे सरकार स्थापन केलं आहे,” असंही त्यांनी यावेळी म्हंटल.

मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत,असे किती वेळा म्हणणार, त्यामुळे आता मुखवटा काढा आणि तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री होण्याची होती हे मान्य करा. जर तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं नव्हतं आणि तुम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं तर तुमच्याकडे रावते. देसाई यांच्यासारखे नेते होते, त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.