हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुढयावरून सध्या भाजपकडून राष्ट्रवादीवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज पुन्हा भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. “ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुद्धा राज्य सरकार चालढकल करते आहे. या सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही!” पवारांना चांगलं माहिती आहे कि, आरक्षण का गेलं ते,” असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.
भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथील दौऱ्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “शरद पवारांना हे चांगलं माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे. फक्त महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण गेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्यातील गेलेलं नाही. या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे. या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही.
आमच्या सरकारच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता. दुर्दैवाने त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.
पण ती मागे घेण्यासाठी या सरकारने कोणतीही पाऊले उचलली नाहीत. राज्य सरकारने लोकांच्या भावना समजून घ्याव्यात.
पुणे येथे माध्यमांशी साधलेला संवाद…https://t.co/ZyQV8BM9v9 pic.twitter.com/NxFiH4W2MW— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 17, 2021
फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारवरही टीका केली ते म्हणाले की, आम्ही ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी इम्पिरिकल डाटा जमा केला होता. शंभर टक्के हा राज्याचा विषय आहे आणि सर्वोच्च राज्याला निर्देश दिले आहेत की इम्पिरिकल डाटा तयार करा, केंद्राला नाही. त्यामुळे ही राज्याचीच जबाबदारी आहे.”