पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाही; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निणर्य राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी घेतला आहे. या ठिकाणी भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली असल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारल्याबाबत आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. 5 वर्षानंतर पर्रीकरांना पुन्हा पणजीमध्ये आणू. मात्र, पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाह, असे फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपमधील दिवंगत जेष्ठ नेते मनोहर पर्रीकर हे संघटक प्रेमी होते. पर्रिकर कुटुंब हे आमचं कुटुंब आहे. उत्पल पर्रीकर यांच्याशी आम्ही चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करू. आम्ही त्यांची स्वतः भेत घेऊन नाराजी दूर करणार आहोत. पर्रिकर कुटुंब हे आमचं कुटुंब आहे.

तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत सांगायचे झाले तर हे हिंदूविरोधी आहे. याचे उदाहरण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत हे समोर आले आहार. कुणाचे कुणासोबत साटलोते आहे हे आमच्यासह सर्वांना माहित आहे. उत्पल पर्रीकरांच्या बाबतीत शिवसेनेकडून दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Comment