हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मोबाईलवरून ऑनलाइनद्वारे तिकीट काढत आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला गेला. यावेळी त्यांच्या सोबत राज्यपालांसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी व इतर नेत्यांनीही प्रवास केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज विना तिकीट मेट्रोतून प्रवास केला. आम्ही विदाऊट तिकीट यात्रा केली आहे तर मेट्रोवाल्यांना सांगणार की नंतर आमच्याकडून वसून करुन घ्या,” असे फडणवीस यांनी म्हंटले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करीत एमआयटी महाविद्यालयात जाऊन संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, आज दिवस पुण्याचा स्वप्नपूर्तीचा दिवस.. आज पुण्याची मेट्रो धावली, याचं पहिलं तिकीट मोदींनी मोबाईलवर पेमेंट करुन काढलं.
आम्ही विदाऊट तिकीट यात्रा केलीये तर मेट्रोवाल्यांना सांगणार की नंतर आमच्याकडून वसून करुन घ्या. अनेक अडचणी होत्या खासकरून आम्ही पण महामेट्रोचं अभिनंदन करतो. महामेट्रोने विक्रमी वेळात पुणे मेट्रोचे काम केले आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पुण्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण https://t.co/izMWhgoD0g
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 6, 2022
यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले.