“राज्य हे काही दलाली खाण्यासाठी नसतं तर ते…”; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व विरोधकांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही. सरकारचं अस्तित्व नाही. राज्य दलाली खाण्यासाठी नसतं, ते मुंबईच्या बाहेर देखील असतं, हे यांना माहीत नाही, अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मला जो महापालिकेचा दोन-अडीच वर्षांचा काळ मिळाला. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मी मेट्रो सुरू करावी, ही नाशिककरांची इच्छा होती. नाशिकचा नियो प्रकल्प पथदर्शी ठरला. आता हेच नियो मेट्रोचे नाशिक मॉडेल देशभरात लागू होणार आहे. हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी आहे. येत्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकतीने उतरावं लागेल. हे तिघे काहीही बोलले, तरी आपल्या तिघांच्या विरोधात लढण्यासाठी हे एकत्र येतील. भाजपला पराभूत करण्यासाठी हे एकत्र येतील.

कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडून नाशिककरांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. मात्र, महापालिकेने ही जवाबदारी स्वीकारली. राज्याने एक नव्या पैशाची मदत केली नाही. शेवटी मी आलो आणि त्यानंतर ऑक्सिजन मिळालं. हे जर जाऊन बसले नसते, तर नाशिकला ऑक्सिजन मिळालं नसते, असाही टोला यावेळी फडणवीस यांनी लगावला आहे.

Leave a Comment