पुरणपोळी, मिसळ अन् बिल; रोहित पवारांकडून फडणवीस -दानवेंना चिमटे??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यानी एके ठिकाणी मिसळ खातानाच फोटो शेअर केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावला आहे.

मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली…एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झाले. आणि हो… मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केले.” असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

नेमकं काय आहे प्रकरण-
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच वेळी 30-35 पुरणपोळी आणि पातेलं भरून तूप खायचे अस विधान त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्यातच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांसह एका ठिकाणी दोनशे वडापाव आणि भज्यावर ताव मारून बिल न देताच निघून गेले होते. या दोन्ही नेत्यांवर रोहित पवारांनी एकाच ट्विट मधून निशाणा साधला.