‘मुळशी पॅटर्न’ पाहिलाय का? बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही… : देवेंद्र फडणवीस

0
107
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठी अशी बैलगाडा शर्यत पार पडत असून शर्तीचा आजचा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेस विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी भाषण करताना बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना थेट इशारा दिला. ” मुळशी पॅटर्न पाहिला का? बैल कधी एकटा येत नाही, तर तो येताना स्वतः बरोबर नांगरही घेऊन येतो. आणि मीही नांगर घेऊन आलो आहे. ज्याचा बैलगाडा शर्यतींना विरोध आहे त्यांच्यासाठी, असे विधान फडणवीस यांनी करत इशारा दिला आहे.

पिंपरी चिंचवड येथील टाळगाव चिखली मधील रामायण मैदानावर भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. आज शर्तीच्या शेवटच्या दिवशी बक्षीस वितरणासाठी खास विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी बैलगाडा मालकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काही लोक मला म्हणाले कि महेशदादा आणि तुम्ही एकसारखेच दिसतायत. मी त्यांना आसागितले कि मुळशी पॅटर्न पाहिला का? बैल एकटा येत नाही तर जोडीने येतो आणि सोबत नांगर घेऊन येतो. हा जो काही उत्साह आहे. नगर कोणाकरता आहे जो बैलगाडा शर्यतीला विरोध करतो त्यांच्या करता नांगर आहे.

अनुपम कायदा तयार केला. प्रथम 2014 मध्ये बंदी आली. तर गॅझेट काढले. त्यानंतर पुन्हा ते कोर्टात गेले आणि बंदी आणली. कायदा तयार केला तरीही ते पुन्हा कोर्टात गेले. मग सुप्रीम कोर्टाने त्याठिकाणी आम्हाला विचारले की, हे सगळे म्हणतात कि बैल हा पळणारा प्राणी नाही. आम्ही सांगितले कि बैल हा पळणारा प्राणी आहे. त्याचा अहवाल आम्ही तयार करु, आणि महेश दादांच्या नेतृत्वात हा अहवाल आम्ही तयार केला. आणि सर्वोच्च न्यायालयाला दिला. आणि न्यायालयाने तो मान्य केला कि बैल हा पळणारा प्राणी आहे. आणि म्हणून बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरु झाली. आम्हाला आता जे करायला लागेल ते करू पण आता शर्यती बंद होऊ देणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%8A-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/1047497455766400/

 

पिंपरी चिंचवड येथील बैलगाडा शर्यतीसाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू या ठिकाणाहून तसेच महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, जालना, नाशिक, सिन्नर यासह पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी उपस्थिती लावली आहे.

जेसीबी, बोलेरो, 3 ट्रॅक्टर, 116 दुचाकींचं बक्षीस

पिंपरी चिंचवड येथील टाळगाव चिखली मधील रामायण मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांसाठी खास बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये 28 लाखांचा 1 जेसीबी,1 बोलेरो, 11 लाखांचे 3 ट्रॅक्टर, 3.5 लाखांच्या 2 बुलेट अन 80 लाखांच्या 114 दुचाकी ठेवण्यात आलेल्या आहेत. बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांना ही वाहन बक्षीस रूपात मिळणार आहेत. यासाठी बैलजोड्यांना पिंपरी चिंचवडचा बैलगाडा घाट मारावा लागणार आहे. तब्बल दीड कोटींच्या घरात बक्षीसांची रक्कम जात असल्याने ही देशातील सर्वात मोठी शर्यत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here