देवेंद्र फडणवीसांवर भाजपने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता भाजपच्या पक्षश्रेष्टींनी नवी जबाबदारी सोपवली आहे. फडणवीसांचा केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र वगळण्यात आले आहे. भाजपने आज केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी नुकतीच केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीरकेली. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह देशभरातील मुख्य भाजपच्या नेत्यांची नाव आहे. या यादीत महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचे नाव देण्यात आलेले आहे.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज संसदीय बोर्डाची नव्याने घोषणा केली आहे. भाजपच्या संसदीय बोर्डातून महाराष्ट्रातील भाजप नेते नितीन गडकरी यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव वगळण्यात आले आहे. भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला आहे.

निवडणूक समिती ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उमेदवारांची यादी कोणती असावी, कुणाला संधी दिली पाहिजे, याबद्दल शिफारस करत असते. आता फडणवीस यांची वर्णी लागल्यामुळे दिल्लीमध्ये त्यांचे वाढले आहे. त्यांची निवड करून भाजपने त्यांच्यावर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

केंद्रीय निवडणूक समितीच्या 15 सदस्यांची नावे

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित भाई शाह, बी. एस. येदयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेन्द्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, बीएल संतोष (सचिव), वनथी श्रीनिवास या पंधरा जणांनाच समावेश समितीत करण्यात आलेला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पत्ता कट

भाजपने संसदीय बोर्डाच्या निवडीसंदर्भात आज एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पक्षाचे केंद्रीय संसदीय बोर्ड गठीत केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये काही जुन्या भाजपच्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे तर काहींना संधी. या समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि के. लक्ष्मण यांना या संसदीय बोर्डात स्थान दिले आहे. तर संसदीय बोर्डातून आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना स्थान देण्यात आलेले नाही.