मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा भाजप नेते अरुण जेटली यांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आली आहे. २६ ऑगस्ट पासून हि यात्रा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भुसावळ येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना संबोधित केले होते. त्यानंतर आता त्यांनी यात्रा स्थगित करणार असल्याचे जाहीर केले.
अरुण जेटली यांच्या निधनाची वार्ता समजतात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पूर्वनियोजित सभेच्या ठिकाणी सभा नघेता. अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी भाषण देखील केले नाही. त्याच प्रमाणे सत्काराचा स्वीकार देखील केला नाही. २ दिवस स्थगित करण्यात आलेली यात्रा पूर्वनियोजित पध्द्तीने २ दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे.
भाजपने अरुण जेटली यांच्या रूपाने एक चांगला नेता गमावला आहे. नरेंद्र मोदी यांनी तर अत्यंत जवळचा मित्र गमावला आहे. अरुण जेटली यांचे आज शनिवारी एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ६६ वर्षांचे होते.