ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नको, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत एकमत- फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था घेण्यास बहुतेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. जोपर्यंत आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत निवडणुक घेऊ नये अशी सर्व पक्षांची भूमिका असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबत बैठक पार पडली. यावेळी विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, नाना पटोले उपस्थित होते.

मागास वर्ग आयोगाकडून इम्पिरिकल डेटा तयार करून घेण्यावर एकमत झालं. तसेच जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये यावर सर्वांचं एकमत झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं.