प्रसंग बाका आहे, फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत असून, कोरोना लसींचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकीय फाटे फोडता कामा नये. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. शेवटी तेही महाराष्ट्राचे नेते आहेत, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

पुढच्या काही काळासाठी राजकीय अडचणीचे प्रश्न बाजूला ठेवले पाहिजेत. सगळ्यांनीच कोरोनाविरुद्धच्या युद्धात उतरलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्सवाची घोषणा केली. लोकांनी लसीकरणात सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी हे आवाहन केले. मात्र, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लसींची तुटवडा आहे. यावरून कोणताही वाद न घालता केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस कशी देता येईल, याचा विचार करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

केंद्र सरकारने नुकताच पुणे शहराला दीड लाख कोरोना लसींचा साठा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. पण फक्त पुण्यातील भाजपच्या महापौरांसाठी केंद्र सरकार हा वेगळा नियम लावत असेल तर हा उर्वरित महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. लोक त्यांना आपला नेता मानतात. त्यामुळे आमचं किंवा तुमचं सरकार आहे हे बघून निर्णय घेऊ नका, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group