हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप, आप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षातील नेत्यांकडून टीका टिप्पणी केली जात आहे. त्या दरम्यान आज भाजप गोवा प्रभारी व महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप आणि तृणमूल्य काँग्रेस पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला. “काँग्रेसचेही डबल इंजिन सरकार होते. त्यांनी काहीच केले नाही. आज तृणमूल काँग्रेस, आप खोटी आश्वासने देत आहेत. आप, तृणमूलसारख्या पक्षनेत्यांना पार्सल करून घरी पाठवा,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी आज गोवा येथील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आधुनिक गोब्याचे शिल्पकार कोण असतील तर ते दिवंगत मनोहर पर्रिकर हे आहेत. त्यांच्यानंतर प्रमोद सावंत यांनी अनेक क्षेत्रांत विकासाला चालना दिली. या राज्याच्या विकासाचा आलेख खूप मोठा आहे. या ठिकाणी सध्या निवडणुकीमुळे अनेक पक्ष आले आहेत. यात तृणमूलही आहे. तृणमूलला भुलून अनेक जण वाहत गेले. गोव्यात तृणमूलचा फॉर्म्युला चालू शकत नाही, हे लक्षात येताच अनेक जण दूर झाले आहेत.”
यावेळी फडणवीसांनी तृणमूलवर टीका करताना ते पुढे म्हणाले, “मगो पक्षाला तृणमूलच्या काळ्याकुट्ट व लोकशाही मान्य नसलेल्या लोकांबरोबर जाणे महागात पडणारे आहे. आज मगोबदद्ल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर तृणमूलचा ध्येय मगोला मान्य असेल तर त्यांना जनता अजिबात मत देणार नाही,” असे फडणवीस याणी यावेळी म्हंटले.