हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘2019 च्या राजवटी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता. शरद पवार हे भाजपसोबत येण्यासाठी देखील तयार झाले होते’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केल्यामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना, “देवेंद्र फडणवीस अत्यंत खोटारडा माणूस आहे” अशी जहरी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस हा राजकारणातील सर्वात खोटारडा माणूस आहे. त्यांच्या इतका खोटारडा माणूस आजवर मी राजकारणात पाहिलेला नाही असे मला दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशीच वक्तव्य केली आहेत. कधी उद्धव ठाकरे तर कधी शरद पवार यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. खरे तर या दीड वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काहीच केलेले नाहीये. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवर तुम्ही ज्या माणसाला तुरुंगात पाठवणार होता त्याला तुम्ही तुमच्या शेजारी बसवले आहे. तुम्ही अगोदर त्यांच्याविषयी बोला, राज्यात मृत्यूचा तांडव सुरू आहे त्यावर बोला. मग भूतकाळात काय घडले काय नाही याच्यावर विचार करा.
देवेंद्र फडणवीसांनी काय म्हणाले?
2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना शरद पवार यांची होती. पण ते म्हणाले, मी इतक्या लवकर यू-टर्न घेऊ शकत नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा. त्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेल आणि त्यानंतर महाराष्ट्राला स्थिर सरकार हवे, त्यामुळे आम्ही भाजपसोबत जात आहोत, अशी भूमिका मी घेईल, असे खळबळजनक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.