एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार ; फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. तर आजच सायंकाळी नव्या शिंदे गट व फडणवीस यांचा शपथविधी होणार आहे. तत्पूर्वी फडणवीस व शिंदे यांनी एकत्रीतरितीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. जनमताचा अपमान करून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या ऐवजी राष्ट्रवादी, काँग्रेसचे जास्त ऐकले. तसेच एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड करायचा निर्णय भाजपने घेतला असल्याची मोठी घोषणा फडणवीसांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांना आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, जनतेने आपली मते हि महाविकास आघाडी सरकारला दिले नव्हते तर भाजप आणि शिवसेनेला दिले होते.

भाजपला सत्तेबाहेर ठेवणे हा जनमताचा अपमान होता. २०१९ रोजी भाजप शिवसेना हि युती आम्हाला अपेक्षितच होती. मात्र, तसे झाले नाही. वास्तविक महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हिंदुत्व, सावरकरांचा अपमान झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा आजन्म विरोध केला, हिंदुत्वाचा विरोध केला, सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करुन भाजपाला बाहेर ठेवला. हा जनमताचा अपमान होता. जनतेनं मतं महाविकास आघाडीला दिलं नव्हतं. ते युतीला दिलं होतं. जनमताचा अपमान करुन महाविकास आघाडी जन्माला आली, असे फडणवीस यांनी म्हंटले.