उद्धव ठाकरेंकडे टोमणे अस्त्र, त्यांच्यामुळेच प्रकल्प राज्याबाहेर; फडणवीसांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करताना खोचक टोला लगावला होता. महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग फळले असं त्यांनी म्हंटल होतं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंकडे ब्रह्मास्त्रापेक्षाही जास्त प्रभावी असं टोमणे अस्त्र आहे असा टोला फडणवीसांनी केला आहे.

गुजरात मध्ये भाजपने विजय मिळवल्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे एक अस्त्र आहे. ते ब्रह्मास्त्रापेक्षाही जास्त प्रभावी आहे ते म्हणजे टोमणे अस्त्र. टोमणे मारल्याशिवाय त्यांचं कुठलंही वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. उद्धवजीना उद्योगाचं महत्त्व कळायला लागलं याचा मला आनंद आहे. कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारे तेच आहेत. रिफायनरी सारखा प्रोजेक्ट त्यांनी बाहेर घालवला असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी आम आदमी पक्षावरही टीका केली. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे बारा वाजले आहेत. गुजरातमध्ये भाजपने इतिहास रचला आहे. आप हा पक्ष फक्त दिल्लीपुरता मर्यादित असून गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो असेही फडणवीस यांनी म्हंटल आहे.