उमेदवारी अर्ज दाखल करताच धनंजय महाडिकांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या विरोधात भाजपने कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांना संधी दिली आहे. दरम्यान महाडिक यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. अर्ज दाखल करताच त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “कोल्हापूरची राज्यसभेची जागा हि पूर्वीपासून भाजपच्याच आहे. निवडणूक जिंकणे हे भाजपला सहज शक्य आहे, असे महाडिक यांनी म्हंटले आहे.

महाडिक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यसभेच्या तिन्ही जागा लढवण्यासाठी आमच्याकडे जे संख्याबळ आहे. त्यामध्ये दोन जागा आमच्या सहज निवडून जातायत. आणि तिसऱ्या जागेसाठी आमच्याकडे ३१ हि संख्याबळ आहे. साधारण ४२ चा कोटा हा अपेक्षित आहे. १० ते ११ सदस्य आमच्याकडे येणे अपेक्षित आहेत. आणि त्याचे गणित भाजप नेत्यांकडून जुळवण्यात आलेले आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कोण आहेत धनंजय महाडिक?

भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे धनंजय महाडिक याचा राजकीय प्रवासही संघर्षमय असा आहे. राजकारणात प्रवेश केल्यापासून महाडिक यांना संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळाले नाही. धनंजय महाडिक हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत. धनंजय महाडिक यांनी लोकसभेची पहिलीच निवडणूक लढवली. सदाशिवराव मंडलिक यांच्याविरोधात लढवलेल्या या निवडणुकीत त्यांचा १४ हजार मतांनी पराभव झाला. मात्र त्यांनी राजकारणातील दिग्गज नेत्याला दिलेली टक्कर हा तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. सध्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्यात झालेली ही निवडणूक राज्यात चुरशीची ठरली होती.

Leave a Comment