माहिती लपवणे हा गुन्हा, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुंडेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. मुंडेंवरील आरोपामुळे राष्ट्रवादी कोंडीत सापडली असून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपने केली आहे. आता भाजप खासदार निलेश राणे यांनी यात उडी घेतली असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट करत आपली भूमिका मांडली. कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे आणि दुसरं, माहिती लपवणं निवडणूक आयोगा नुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की राजकीय आयुष्यामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अशावेळी कोणी काही आरोप करत असेल तर त्याची आधी चौकशी होणे आवश्यक आहे. सत्यता न पडताळता निष्कर्षावर येणे योग्य नाही, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like